कुतुब मिनार - Heritage my India

Latest

Saturday, June 2, 2018

कुतुब मिनार

कुतुब मिनार

  • भारतात सुवर्ण युग होते तेंव्हाखैबर खिंडीतून अफगाणिस्तान,तुर्कस्थान, मंगोलिया येथून भारतावर सतत आक्रमणे होत होती. आक्रमण करून दौलत लुटून ते निघून जात असत. दिल्लीवर हिंदू राज्यच होते.
  • पण मुसलमानांना दिल्ली जिंकायची होती. गजनीचा महमद घोरी हा मुख्य होता. तो खैबर खिंडीतून भारत( आताचा पाकिस्तान) येथील राजाचा पराभव करून खंडणी गोळा करून जात असे. पण रजपूत राजा पृथ्वीराज चव्हाण यास हरविणे त्याला जमत नव्हते. त्याचा सैन्यातील गुलाम कुतुबुद्दीन ऐबक ह्याच्या पराक्रमामुळे घोरी ला दिल्ली जिंकता आली. त्याने ह्या वेळी कुतुबुद्दीन ऐबकला दिल्लीचा कारभार पाहण्यास ठेवले. नंतर त्याच्या मृत्युनंतर कुतुबुद्दीन ऐबक ने स्वत:ला बादशाह/ सुलतान म्हणून घोषित केले.
  • त्यानंतर उत्तर भारतावर मुसलमानांचे राज्य सुरु झाले. ह्या विजयाचे प्रतिक म्हणून कुतुबुद्दीन ऐबक ह्याने हा मिनार बांधण्यास ११९२ मध्य सुरुवात केली.
उमललेले कमळ :
  • कुतुबुद्दीन ऐबक च्या काळात फक्त पहिला मजला बांधला गेला. नंतर त्याच्या जावयाने म्हणजे अल्तमश ह्याने नंतरचे तीन माजले बांधले. १३६९ मध्ये तुघलक ने आणखी एक मजल वाढविला. अशा तर्‍हेने हा पाच मजली मनोरा बांधला गेला. हा मनोरा वरून पहिला असता उमललेल्या कमळासारखा दिसतो. कारण ह्याचा पाया मोठा आणि मनोर्‍याच्या कडेला कमळांच्या पाकळ्यांची महिरप आहे आणि तो शेवटी निमुळता होत गेलेला आहे. कुतुब कॉम्प्लेक्स या मोठ्या मैदानामध्ये हा मनोरा उभा आहे. याचा पाया १४.३ मीटर आहे आणि तो निमुळता होत २.७ मीटर वर सर्वात वरचा मजला आहे. याच्या आत मध्ये वक्राकार जिना आहे. त्याला ३८९ पायऱ्या आहेत. अफगाणिस्तान मध्ये जाम नावाच्या मनोर्‍यावरून याचे वास्तुशिल्प घेतले आहे.
  • असे म्हणतात की आजूबाजूच्या २७ हिंदू देवालयांची मोड तोड करून हा मनोरा बांधलेला आहे. पहिले ३ मजले लाल सॅण्डस्टोनचे आहेत. चौथा मजला मार्बल आणि पाचवा मजला मार्बल आणि सॅण्डस्टोनचा बनला आहे. हा धील्लिका देवीच्या बालेकिल्ल्याच्या अवशेषांवर उभा आहे. याच्या वर कुराणचे आयत नक्षीदार स्वरुपात लिहिलेले आहेत. हा थोडासा कललेला आहे. याच्या जवळच कुतुबुद्दीन ने कुव्वत-उल-इस्लाम हि मशीद बांधली आहे.
गरुड ध्वज :
  • याच परिसरात गुप्त घराण्याच्या काळातला एक लोखंडी खांब आहे. त्याच्यावर ब्राम्ही लिपीने वचने कोरलेली आहेत. याला कधीही गंज चढलेला नाही हे एक वैज्ञानिक आश्चर्य आहे. असे म्हणतात की या खांबाला पाठ लावून उभे राहिले आणि हाताने वेढले असता जर हात एकमेकात मिळाले तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते. म्हणून किती तरी पर्यटक येथे आपले नशीब आजमावून बघतात.
  • कुतुबुद्दीन ऐबक हा मुहम्मद घौरीचा गुलाम होता. पण त्याने ऐबकला सेनापती बनवले आणि दिल्लीचा कारोबार बघावयास दिला. तेव्हा पासून दिल्लीवर माल्मुक किंवा गुलाम घराण्याचे मुसलमान राज्य सुरु झाले.
  • या मनोर्‍याची पंधराव्या आणि अठराव्या शतकात भूकंपाने हानी झाली होती पण सिकंदर लोधी आणि मेजर रॉबर्ट स्मिथ यांनी तो दुरुस्त केला. १९८१ मध्ये वीज पुरवठा बंद झाल्यामुळे धक्का बुक्कीत ४५ जण मेले तेव्हापासून मिनार मध्ये जायला लोकांना बंदी केली आहे.
  • असा हा वास्तु शिल्पाचा चमत्कार युनेस्को ने वर्ल्ड हेरीटेज साईट मध्ये सामील करून घेतला आहे आणि हा जगामध्ये विटांचा बनलेला सर्वात उंच (७२.५ मीटर) मिनार आहे.

No comments:

Post a Comment

Thank you for comment