खरोसा लेणी - Heritage my India

Latest

Monday, April 9, 2018

खरोसा लेणी

खरोसा लेणी
लेण्यांचा प्रकार :- हिंदु (ब्राम्हणी) लेणी
जिल्हा : लातूर श्रेणी : सोपी
बिदर महामार्गावर खरोसा गावाजवळील टेकडीवर हिंदु लेणी आहेत. हि लेणी जांभ्या दगडात कोरल्यामुळे काळानुसार उन वारा पाऊस यामुळे या लेण्यांची झीज झालेली आहे. महामार्गावरून थेट लेण्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. खरोसा गावात एक पडकी गढी पहायला मिळते.
लेणी :- खरोसा येथील सर्वात मोठे लेणे दुमजली आहे. त्यात भिंतीवर शिव, विष्णू, ब्रम्हा, व्दारपाल शिवलिंग कोरलेली आहेत. दुसर लेण हे शैव लेण आहे. यात गाभार्‍यात शिवलिंग आहे. गाभार्‍याच्या दारावर व्दारपाल व नाग कोरलेले आहेत. सभामंडप अनेक खांबांवर तोललेला आहे. सभामंडपाच्या भिंतीवर शिल्प कोरलेली आहेत.
जाण्यासाठी :-
लातूर - बिदर रस्त्यावर लातूर पासून ४३ किमीवर व औसा पासून २३ किमी अंतरावर खरोसा गाव आहे. गावापुढे असलेलया टेकडीवर हिंदू लेणी आहेत. मघामार्गावरून एक पक्का रस्ता थेट डेकडीवरील लेण्यांपर्यंत जातो.
आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-
१) लातूर - बिदर रस्त्यावर औसा पासून ३४ किमीवर निलंगा गावात नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्याची माहिती साईट्वर दिलेली आहे.
२) लातूर - औसा - उदगीर हे अंतर ९७ किमी आहे. उदगीर येथे किल्ला आहे.
३) स्वत:च्या वहानाने वरील सर्व ठिकाणे एका दिवसात पाहून लातूर/ उदगीर येथे मुक्कामाला जाता येते.
४) उदगीर किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.

No comments:

Post a Comment

Thank you for comment