गेट वे ओफ इंडिया - मुंबई - Heritage my India

Latest

Wednesday, June 6, 2018

गेट वे ओफ इंडिया - मुंबई

गेटवे ऑफ इंडिया हे महाराष्ट्रामधील मुंबई या शहराच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेली एक कमानवजा इमारत आहे. एक मुख्य रुंद कमान आणि बाजूला चिकटून दोन कमी रुंदीच्या कमानी असे या बांधकामाचे स्वरूप आहे. अपोलो बंदराच्या(आता शिवाजी महाराज बंदर-गुजराथीत पालवा बंदर)) भागात असलेली ही वास्तू २६ मीटर उंच आहे.
भारताच्या भेटीला येणाऱ्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी झाली.


* भारतभेटीला आलेल्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. जॉर्ज विटटे यांच्या कल्पनेतून साकार झालेली वास्तू असून वास्तूचे बांधकाम पिवळ्या बसातर दगडात केले आहे.
* वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. या वास्तूचे बांधकाम आणि त्यावरील सुंदर गुजराती शिल्पकला वाख्ण्याजोगी आहे. अशी भव्य-दिव्य वास्तू पहिल्या नंतर येथून समुद्रात ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणीला नक्कीच भेट द्या.
गुंफामध्ये कोरलेल्या भव्य हत्ती व प्राचीनकालीन शिवकालीन लेणी पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोट दर तासाला सुटतात. या फेरी बोटांचा प्रवास सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असून या बोटीतून प्रवास करण्यासाठी ८० ते १२० रुपये पर्यंत तिकीट आकारले जाते.
त्याचबरोबर येथील देशी-परदेशी लोकांचे मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यागाड्या आणि टांगे. प्राचीन मुंबईत आलेल्या प्रत्येक पर्यटकाची पहिली पसंती असलेल्या या वास्तूसमोर छायाचित्र काढण्याची उत्सुकता सर्वांनाच असते.
गेट वे ऑफ इंडिया व भव्य विशाल अशा ताज होटेल समोर वेगवेगळ्या पोझमध्ये उभे राहून पर्यटकांचे फोटो काढण्यास अनेक छायाचित्रकार असतात. निव्वळ २० ते ५० रुपये आकारून हे फोटो काढून दिले जातात.

No comments:

Post a Comment

Thank you for comment