लालकिल्ला हा जगातील भव्यदिव्य राजवाड्यांपैकी एक आहे. ह्या किल्ल्याची स्थापना इ.स. १६४८ मध्ये यमुना नदीच्या किनारी झाली.याची स्थापना मुघल सम्राट शाहजहाने केली,बांधकामासाठी लालसंगमरवरी दगड वापरल्याने याचे नाव ''लाल किल्ला ''असे पडले .
ह्या किल्ल्याचे महत्त्वही तेवढेच मोठे आहे कारण 'भारत स्वतंत्र झाला ' ही बातमी पहिल्यांदा पंडित नेहरू यांनी ह्याच किल्ल्यावरून घोषित केली. ह्या किल्ल्याच्या मैदानात दर १५ ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते कार्यक्रम राबविले जातात. तसेच अनेक भाग हे अतिशय प्रेक्षणीय आहेत. जसे नक्कर खाना, दीवन-ए-आम, नहर-ए-खास, जनाना खास महल, दिवान-ए-खास आणि मोर्ता मस्जिद, ह्यात बख्श बाग या सारखे आहेत .
मार्ग : - दिल्ली जाण्यासाठी मुंबईहून विमान आणि रेल्वे सेवा उपलब्ध आहे. जुन्या दिल्ली पासून ३३ किमी अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी दिल्ली मंडळाच्या बस तसेच खाजगी टेक्सी सेवा उपलब्ध आहे .
No comments:
Post a Comment
Thank you for comment