विजयदुर्ग - Heritage my India

Latest

Thursday, April 26, 2018

विजयदुर्ग

विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
नावविजयदुर्ग (किल्ला)
प्रकारजलदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणदेवगड , महाराष्ट्र
जवळचे गावविजयदुर्ग
सध्याची अवस्थाव्यवस्थित


 विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे. कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे हे एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार होते.
विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.
विजयदुर्गला पोहचायचे कसे:
विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे मुंबई गोवा महामार्गावरून तळेरे इथून उजवीकडे वळून ५२ किमी अंतरावर विजयदुर्ग आहे मुंबई व पुण्यावरून विजयदुर्ग इथे थेट जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे विजयदुर्ग हे सागरी महामार्गापासून १४ किमी आत आहे.नव्या रेवस रेड्डी सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग ते रत्नागिरी हे अंतर सुमारे ८० किमी ने कमी झाले आहे. विजयदुर्ग येथे व्हाया रत्नागिरी मार्गे हि जाऊ शकतो. रत्नागिरी,पावस,जैतापूर,कात्रादेवी,पडेल कॅन्टीन मार्गे रत्नागिरीहून विजयदुर्गला २ तासात पोहचता येते. ह्या नव्या सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग येथे पोहचण्याचे ३ तास वाचले आहेत.तेव्हा ह्या मार्गाचा हि पर्यायी मार्ग म्हणून वापर करू शकता.आणि समुद्रकिनारी सर्व गावांचे आणि निसर्गाचे दर्शन घेत आपण विजयदुर्ग येथे पोहचाल.विजयदुर्ग हे समुद्रामार्गी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या समोरील बाजूस राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारा आणि शिरसे गावाची खाडी हि दिसते.
विजयदुर्ग येथे एसटी आगार असून येथे दिवसाकाठी मुंबई ला जाण्यासाठी २ बसेस आहेत तर पुण्याला जाण्यासाठी १.आणि दर एक तासाने देवगड इथे जाण्यासाठी हि बसेस आहेत . तालुक्याचे ठिकाण  : देवगड बाजारपेठ आणि तालुक्याचे ठिकाण देवगड जवळील बाजारपेठ : पडेल कॅन्टीन , तालुका:देवगड जवळील रेल्वे स्थानक : कणकवली रेल्वे स्थानक ८० किमी आणि रत्नागिरी रेल्वे स्थानक ७५ किमी. ग्रामदैवत: रामेश्वर मंदिर,विजयदुर्ग

No comments:

Post a Comment

Thank you for comment