तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे.
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर.दुर्ग कोटात अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसर्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्या पर्यंतचे अंतर ६० किमी आहे.
नाव
|
तोरणा
|
उंची
|
१४०३ मीटर/४६०४ फूट
|
प्रकार
|
गिरिदुर्ग
|
चढाईची श्रेणी
|
मध्यम
|
ठिकाण
|
वेल्हे तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
|
जवळचे गाव
|
वेल्हे
|
डोंगररांग
|
सह्याद्री
|
सध्याची अवस्था
|
चांगली
|
इतिहास
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेवून स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. शिवरायांनी १६४७ मध्ये तोरणा किल्ला जिंकला व हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारले.
हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठांचा एकमेव किल्ला होय. सध्या किल्ल्याच्या तटबंदीचे काम चालू आहे. तोरणा गडावर मेंगाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर खूप जुने आहे
गडावर जाण्याचा मार्ग
पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरणाच्या पाय्ध्याशी आहे.पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्ग वेल्हे अशा मार्गाने तोरणा गडाच्या पायथ्या पर्यंत जाता येते.शिवकालीन वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊल वाटणे दीड-दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते.हा मार्ग इतर मार्ग पेक्षा सोपा आहे.अवघड ठिकाणी पुरातत्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत.त्यामुळे सहज चढ उतार करता येतो. दुसरा मार्ग वेल्हेयापासून ५ की.मी अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे.गावाच्या पश्चिमेकडून थेट वाट वाळण्जाई दरवाज्यातून बुधला माचीवर जाते.या वहिवाटीच्या वाटाशिवाय चोर दारातून येणारे मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहेत.वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजावण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आहे.
Very good keeep it up
ReplyDelete